Skip to main content

Posts

Featured

नाती आणि मनुष्य

    कधी कधी वाटतं की या आयुष्यरूपी शरीरावर नात्यांची वस्त्रे कधीच परिधान करू नये पण माणसाला विवस्त्र आयुष्य ही जगता येत नाही म्हणून मग जे भेटेल ते परिधान करण्याशिवाय मनुष्याकडे पर्याय राहत नाही. बहुतांश वेळा असं पण होतं की  जास्त भरजरी वस्त्रे पण आपण परिधान केली तरी पण त्याचा जरी काठ आपल्याला कुठे तरी टोचत राहतो.     'नाती जपली पाहिजेत' हे तत्त्व जरी खरं असलं तरी त्या तत्त्वामध्ये एवढी ताकत नाहीये की जुने रुसवे फुगवे विसरून माणूस नव्याने परत नातं जपायला येईल. ज्यांना थोडं का होईना पण आयुष्य कळालं आहे ते च फक्त हे तत्त्व आणि त्या मागचा अर्थ समजू शकतात. आणि नाती जपताना पण नेहमी शरणागती यांनाच पत्करावी लागते, हे ही तितकंच सत्य आहे. जर नातं हे दोन व्यक्तिमधील असेल तर मग ते सांभाळण्याचं ओझं एकानेच का आपल्या खांद्यावरती सहन करायचं ? पण सहसा होतं असंच की फक्त एकच व्यक्ति ते नातं टिकून राहण्यासाठी धडपड करत असतो अगदी स्वतःच्या रक्ताने आपल्या नात्याची बाग फुलवल्या सारखी, पराकोटीचे हाल सोसून! आणि दुसरा व्यक्ति मात्र अगदी उन्माद‌पणे त्या बागेत धुडगूस माजवतो, ती बाग उध्...

Latest posts

अश्रू आणि मन

आठवणी आणि अनुत्तरीत प्रश्न

स्थितप्रज्ञ

मृत्यू आणि सत्य

मैत्री आणि प्रेम

संवाद आणि भावना

सहवास

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।