मैत्री आणि प्रेम

मैत्री आणि प्रेम या दोन्ही मानवी मनाच्या अतिशय सुंदर अशा भावना आहेत. या दोन्हींशिवाय मानवी जीवन हे अशक्य आहे. या दोन्ही भावनांइतके पवित्र दुसरे काहीच नाही परंतु या जगाने या दोन्हींच्या व्याख्या पूर्णपणे बदलून त्यांना अपवित्र केलेले आहे. मैत्री आणि प्रेम जेवढे लिहायला , वाचायला सोपं तेवढेच टिकवायला कठीण! प्रेमात प्रेम जेवढे महत्त्वाचे आहे तेवढीच मैत्री सुद्धा महत्त्वाची आहे आणि मैत्रीत सुध्दा प्रेमाचा वाटा फार मोठा आहे कारण मित्र-मैत्रिणी म्हणून आपला एकमेकांवर जीव तर असतोच. जर दोन्ही गोष्टी आपण पूर्णपणे निभावल्या तर आपल्याला प्रत्येक बंधनातून मुक्त करण्याचे सामर्थ्य मैत्रीत आणि प्रेमात आहे. एक मुलगा आणि मुलगी मित्र असू शकत नाही हा विचार च मुळात चुकीचा आहे आणि हा विचार समूळ उखडून काढायलाच हवा कारण मैत्री ही मैत्री असते आणि ती सर्वांसाठी सारखीच असते. मैत्रीमध्ये स्वार्थ आणि प्रेमामध्ये वासनेचा लोभ नसेल तर आपल्या निर्जन आयुष्यातील मैत्री आणि प्रेम अमृताचे घोट आहेत याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल. 

-हाजरा

Comments