अश्रू आणि मन
असे म्हणतात की अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतिक आहे पण असे जरी असले तरी सुध्दा दुबळ्या मनाचं एका कणखर मनामध्ये रुपांतर हे अश्रूच करत असतात. आपल्या आयुष्यात जसं हास्य महत्त्वाचं आहे तसंच आपल्या कणखर मनासाठी अश्रूरूपी वंगण ही तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा भावना शब्दांत व्यक्त करता येत नाही तेव्हा त्या अश्रूंमध्ये व्यक्त होतात मग ते आनंदाश्रू असो किंवा दुःखाचे अश्रू. म्हणूनच जेव्हा मनाचं आभाळ दाटून येते तेव्हा अश्रूरूपी सरी सुद्धा बरसल्याच पाहिजेत. त्यामुळे जेव्हा आपण कोणासमोर आपले अश्रू गाळून आपल्या मनाची व्यथा सांगतो तेव्हा आपलं त्यांच्यासोबत असलेलं नातं अजून जास्त दृढ होतं. निष्कर्ष एवढाच की अश्रू हे कमीपणा आणि निर्बलताचे लक्षण नसून ते कणखर मनासाठी उचललेलं प्रथम पाऊल आहे.
-हाजरा
Comments
Post a Comment