स्थितप्रज्ञ

आपल्या आयुष्यात खूप लोकांचा सहवास आपल्याला लाभतो आणि सगळेच आपल्याला काही ना काही तरी शिकवून जातात चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा! काही जण आपल्याला चांगले अनुभव देतात तर काहीजण वाईट अनुभव देतात. पण काहीजण आपल्या आयुष्यात येतात ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात माजलेल्या खळबळांची जाणीव करून देण्यासाठी व ते स्वतःच कुठल्याही प्रलोभनाच्या जाळ्यात अडकत नाहीत आणि जो कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही तोच स्थितप्रज्ञ! जरी कुठल्या प्रलोभनाला बळी पडलाच तर सत्याच्या जाणीवेतून त्या प्रलोभनापासून दूर जाण्याचा विचार करणे हेच स्थितप्रज्ञ व्यक्तिचं लक्षण आहे. या व्यक्तिंच्या स्वभावामुळेच त्यांचा सहवास लाभलेल्या प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल विचार करायला ते भाग पाडतात. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच आपल्या भरकटलेल्या मनातील गुरफटलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडतात. ते ही नकळतच! गरजेच्या वेळी त्यांचेच शब्द प्रेरणा देण्याचं काम करतात. या स्थितप्रज्ञ व्यक्तिच्या शब्दांमुळे आपल्या मनाच्या वाळवंटावर अमृताच्या सरी बरसल्याचा भास आपल्याला होतो. निर्विवादपणे अशा व्यक्तिंचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही.
-हाजरा

Comments