सहवास
कधीकधी आपल्याला आपल्याच मनाचा अंदाज येत नाही. मग तेव्हा वाटतं की मनाचं नसणं हेच उत्तम! जगाला सहज फसवता येते पण स्वतःला फसवणे हे अशक्यच! आपण जरी स्वतःला फसविण्याचा प्रयत्न केला तरी जास्त त्रास आणि वेदना आपल्याच मनाला होतात. त्यापेक्षा मग मनाला सत्यतेची जाणीव असणे हे केव्हा पण योग्यच. अशामुळे वेदनांतून होणारा त्रास नक्कीच कमी होईल.
त्या मनस्थितीत नकळतच अश्रूंच्या धारा बरसतात तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी असावं जो आपल्याला समजून घेईल अगदी तसंच जसं आपण दुसऱ्यांना समजून घेतो. पण खरं तर तेव्हा आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही तर स्वतःचीच गरज असते. स्वतःसोबत पण वेळ घालवणे हे तितकेच महत्वाचे जितकी एका आस्तिकाला त्याची श्रद्धा महत्वाची! मनाला स्वतःच्या सहवासाचे वंगण वेळोवेळी देण्याने खूप कोडी सुटतात कारण आपल्या मनाला आपल्या इतकं दुसरं कोणीच समजू शकत नाही हे आणि फक्त हे च मनाचं गुपित आणि सत्य आहे.
Comments
Post a Comment