संवाद आणि भावना

     संवाद आणि संवादातून व्यक्त होणाऱ्या भावना या फार महत्त्वाच्या असतात कारण प्रत्येकासोबत होणारा संवाद आणि त्यातील भावना या सारख्या नसतात. त्या अवलंबून असतात फक्त आणि फक्त समोरचा व्यक्ती आपल्याला कसा वागवतो या वर. समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला प्रेमाने वागवलं तर साहजिकच आपल्या संवादातील भावना या प्रेममय च असणार. 
     खूप कमी असे लोक असतात ज्यांच्यासोबत असा प्रेम पूर्ण संवाद होतो त्यांच्यासोबत कितीही संवाद साधला तरी मन भरत नाही. पण सर्वच भावना तर व्यक्त करता येत नाहीत मग त्या व्यक्तींकडून आपली हीच अपेक्षा असते की त्यांनी त्या अव्यक्त भावना समजून घ्याव्यात. खूप वेळा असा एक विचार चमकून जातो की आपण ज्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तींना बघतो अगदी त्याच दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःकडे पाहिलं तर त्यांच्याच नजरेत स्वतःबद्दलचा आदर वाढेल. कितीही केलं ना तरी संवाद होणे फार गरजेचं आहे. खूप प्रश्न हे फक्त आणि फक्त संवादातून च सुटतात आणि जर उत्तम संवादकर्ते असतील तर संवाद हा डोळ्यांनी सुद्धा साधता येतो. योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीबरोबर संवाद झाला की मनोभूमीवर कल्पवृक्ष असल्याचा प्रत्यय आपल्याला येतो. फक्त फलदायी संवाद महत्त्वाचा बाकी काही नाही! 

Comments