Skip to main content
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।
कृष्णा..तुझ्या सावळ्या रंगाच्या बाधेतून सुटका होणे अशक्य आहे आणि सुटका व्हावी अशी माझी इच्छा पण नाही. तुला मी एकेरी मध्येच संबोधते कारण तू मला नेहमीच जवळचा वाटत आला आहे. एका जिवलग मित्रासारखा माझ्या प्रत्येक परिस्थितीत तू माझ्यासोबत असतो, तुझे विचार माझ्यासोबत असतात. जीवनातील सार सांगणारा तूच. जगातील सर्वात मोठा योग हा प्रेमयोग आणि जीवन व जग चालवण्याचे एकमेव साधन म्हणजे प्रेम हे सांगून प्रेमाचा खरा अर्थ समजवणारा सुद्धा तूच. माझ्या मनाच्या गाभाऱ्यातील प्रेम म्हणजे तूच. एकंदरीतच माझं जीवन हे 'श्रीकृष्णार्पणमस्तु' म्हणजे तुलाच अर्पण केलेलं आहे.
-हाजरा
Comments
Post a Comment